09 March 15:56

मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता


मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: रविवार व सोमवार अर्थात १० आणि ११ मार्च रोजी मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. शिवाय १२ मार्चलाही विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (आयएमडी) वर्तवण्यात आला आहे.

गेले काही दिवस वातावरणात किंचित बदल जाणवत आहे. शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाडा तसेच विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे.

कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात तसेच विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आलं आहे.टॅग्स