14 July 16:53

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आयएमडीविरोधात तक्रार दाखल


मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आयएमडीविरोधात तक्रार दाखल

कृषिकिंग, बीड: “मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) विरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. त्यात बियाणे व कीटकनाशक उत्पादकांशी संगनमत करण्याबाबत आणि मॉन्सूनचा अंदाज देत असल्याचा आरोप केला आहे. पुणे आणि कुलाबा विभागातील अधिकाऱ्यांनी बियाणे उत्पादकांसोबत संगनमत करून शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.” असे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंडुरुड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत आनंदगाव गावातील शेतकरी गंगाभिशन थावरे यांनी म्हटले आहे.

आयएमडीने यावर्षी जून-जुलैमध्ये भरपूर पाऊस पडणार असल्याचे भाकित वर्तवले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीही केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाऊस झालाच नसल्यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे आयएमडी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याच्या कारणास्तव आम्ही तक्रार दाखल केली आहे. असे थावरे यांनी सांगितले.

थावरे यांनी सांगितले आहे की, आम्ही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिले आहे. या पत्रात "आयएमडी अधिकारी आणि बियाणे उत्पादक कंपन्यांमध्ये संगनमत होऊन आयएमडीने यावर्षी जबरदस्त मॉन्सूनचा अंदाज लावला. आणि सध्या शेतकऱ्यांवर निर्माण झालेल्या दुबार पेरणीच्या संकटाला तेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. असे म्हटले आहे.

तसेच, माजलगाव येथील पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “त्यांना शेतकऱ्यांकडून आयएमडीविरोधात तक्रारी मिळाल्या आहे. आणि आम्ही या सर्व प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहोत. दरम्यान, हवामान विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने अजून यासंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही,” असेही त्यांनी सांगितले.टॅग्स