04 April 10:35

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता- आयएमडी


मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: राज्यातील तापमानाने चाळीशी पार केलेली असतानाच, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज वादळी वारा व विजांचा कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.

मराठवाडयाच्या प्रामख्याने बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. शेतकरी, नागरिकांनी दुपारी ३ ते संध्याकाळी ७ या कालावधीत कामे करू नये, तसेच वीज चमकत असताना झाडाखाली, उघड्यावर व पाण्याचा स्रोत असेल अशा ठिकाणी जाऊ नये. याशिवाय विजेच्या खांबांना जनावरे बांधू नये, असे आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.