18 December 11:36

मनीऑर्डर परत आल्याने शेतकरी संजय साठेंचं मोदींना पत्र


मनीऑर्डर परत आल्याने शेतकरी संजय साठेंचं मोदींना पत्र

कृषिकिंग, नाशिक: कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने आलेले पैसे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पाठविणारे शेतकरी संजय साठे यांनी पुन्हा एकदा आपली कैफियत मांडण्यासाठी मोदींना पत्र लिहिले आहे. साठे यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेला कांदा काळसर होता, त्यामुळे त्याला भाव मिळाला नव्हता, असा अहवाल अधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे सादर केला. हा अहवाल चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे साठे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

कोणताही अधिकारी मला भेटण्यासाठी आलेला नाही. माझी बाजू कोणीही ऐकलेली नाही. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांनी बाजार समितीत जाऊनही पाहणी केलेली नाही. तरीही चुकीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे सादर करण्यात आल्याचे साठे यांनी सांगितले आहे. त्यामुळेच आपण पंतप्रधानांना पत्र लिहून हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. मला केवळ शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधायचे आहे. बाकी माझा कोणताही उद्देश नाही. असेही साठे म्हणाले आहे.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात शेतकरी साठेंची मनीऑर्डर पंतप्रधान कार्यालयाने परत पाठवली होती. बातमी सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. http://bit.ly/2RQMpee,

तर 'कृषिकिंग'ने सर्वप्रथम शेतकरी संजय साठे यांनी पंतप्रधानांना मनीऑर्डर केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. (बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://bit.ly/2Rp8Abh)