19 July 07:15

मध्यप्रदेशातील बाजारपेठांमध्ये सडतोय कांदा...


मध्यप्रदेशातील बाजारपेठांमध्ये सडतोय कांदा...

कृषिकिंग, भोपाळ: कांदा उत्पादक शेतकऱ्यांची इतकी दुर्दशा यापूर्वी कधी झाली नसेल. चांगल्या उत्पन्नाची आस ठेवून मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र, कांद्याच्या दरात मागील ३ वर्षांपासून मोठी घसरण होत आहे. मध्यप्रदेश सरकारने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी तर केली. परंतु, सरकारने साठवणुकीची व्यवस्था केली नसल्यामुळे कांदा बाजारपेठांमध्ये सडत असल्याचे समोर येत आहे.

मध्यप्रदेशातील नरसिंहपूर बाजार समितीमध्ये साठवण्यासाठी जागा नसल्यामुळे येणाऱ्या पावसात हजारो टन कांदा मोठ्या प्रमाणात भिजून सडत आहे. आणि त्यामुळे बाजार समिती परिसरात सडलेल्या कांद्याची दुर्गंधी पसल्याचे चित्र आहे. मध्यप्रदेशातील सर्व कांदा उत्पादक प्रदेशांमध्ये हीच परिस्थिती आहे. सरकारने खरेदी केलेला कांदा सर्व बाजारपेठांमध्ये सडतो आहे.टॅग्स