20 December 12:52

मध्यप्रदेशात २ तासात कर्जमाफी; फडणवीसांचा ३६ महिने अभ्यास- मुंडे


मध्यप्रदेशात २ तासात कर्जमाफी; फडणवीसांचा ३६ महिने अभ्यास- मुंडे

कृषिकिंग, बीड: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या दोन तासात शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रात शेतकरी संपावर गेले, मोच्रे काढले, विरोधकांनीही मागणी लावून धरली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलग ३६ महिने अभ्यास करून कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे दोन विद्यार्थ्यांच्या क्षमतेसारखा मुख्यमंत्र्यांमध्ये फरक असल्याचा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यात बैठक घेऊन महिना लोटला तरी दुष्काळाच्या उपाययोजनेची अंमलबजावणीच झाली नाही, असेही ते यावेळी म्हणाले आहे. बीड येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांची भेट घेऊन दुष्काळातील उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबतचे निवेदन दिले. त्यांनतर त्यांनी बोलताना ही माहिती दिली आहे.