15 March 16:48

मध्यप्रदेशात कांदा प्रोत्साहन योजना लागू; महाराष्ट्रीयन कांद्याला फटका बसणार


मध्यप्रदेशात कांदा प्रोत्साहन योजना लागू; महाराष्ट्रीयन कांद्याला फटका बसणार

कृषिकिंग, भोपाळ: मध्यप्रदेश मधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कमलनाथ सरकारने मुख्यमंत्री कांदा प्रोत्साहन योजना लागू केली आहे. त्यामुळे आता एमपीतील शेतकऱ्यांना ८०० रुपये क्विंटल भावाने कांदा खरेदी केल्यानंतर वाहतूक आणि साठवणुकीसाठी ७५ टक्के अनुदान मिळणार आहे. याशिवाय ८०० रुपये भाव न मिळाल्यास बाजारातील विक्री किंमत आणि ८०० रुपये यातील फरकही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

परिणामस्वरूप, आता देशांतर्गत बाजारासह निर्यातीत मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांचा वरचष्मा राहणार असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी राहण्याबरोबर भावाचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. अगोदरच यावर्षी उन्हाळ, पोळ आणि रांगडा कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. राज्य सरकारने क्विंटलला २०० रुपये; याप्रमाणे जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचे ठरवले आहे. मात्र हे अनुदान बहुतेक शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नसून, त्यातून नुकसानाची भरपाई झालेली नाही.टॅग्स