10 February 10:57

मध्यप्रदेश सरकारची रब्बीसाठीही भावांतर योजना; ४००० कोटींची तरतूद


मध्यप्रदेश सरकारची रब्बीसाठीही भावांतर योजना; ४००० कोटींची तरतूद

कृषिकिंग, नवी दिल्ली: “खरीपात शेतालामालाचे दर हमीभावाच्याही खाली गेल्याने मध्यप्रदेश सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी भावांतर योजना सुरु करून हमीभाव आणि मोडल किंमत यातील फरक दिला. ही योजना खरीपात यशस्वी झाल्यानंतर आता एमपी सरकारने २०१७-१८ च्या रब्बीतील कांदा, हरभरा, मोहरी, मसूर या पिकांचाही समावेश या भावांतर योजनेत करण्यात आला आहे.” अशी मध्यप्रदेशचे कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन यांनी दिली आहे.

रब्बी हंगामातील महत्वाच्या पिकांचाही या योजनेत समावेश केल्याने आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेसाठी सरकारने २०१७-१८ या भावांतर योजनेसाठी ४००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील शेतकरी भावांतर योजनेसाठी १२ फेब्रुवारी ते १२ मार्च या काळात नोंदणी होऊ शकणार आहे. त्यानंतर १५ मार्च ते ३० जून या काळात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला जाणार आहे. अशी माहितीही त्यांनी दिली आहे.