20 February 10:21

मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता- आयएमडी


मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, मुंबई: गोव्यासह संपूर्ण राज्यात २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान हवामान कोरडे राहील, तर २३ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

आज (मंगळवारी) दिवसभर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, १८ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे. सोमवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १२.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.टॅग्स