19 December 15:34

मंत्री मागण्या ऐकत नसतील तर...कांदे फेकून मारा- राज ठाकरे


मंत्री मागण्या ऐकत नसतील तर...कांदे फेकून मारा- राज ठाकरे

कृषिकिंग, नाशिक: "मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडतांना मंत्री आपलं म्हणणं ऐकून घेत नसल्याचे राज ठाकरे यांना सांगितले. यावेळी मंत्री तुमच्या मागण्या ऐकत नसतील तर त्यांना कांदे फेकून मारा." असा सल्ला राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची राज ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हा सल्ला दिला आहे.

राज ठाकरे कालपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. काल दिंडोरी येथे लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे राज ठाकरेंना गाडीतून बाहेर पडणेही मुश्किल झाले होते. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करून गर्दी पांगवावी लागली. राज ठाकरेंना मिळणारा हा प्रतिसाद मतांमध्ये परावर्तित होतो का? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.टॅग्स