25 November 10:31

भाववाढ झाली...तर कांदा स्वस्त धान्य दुकानातून विका- पवार


भाववाढ झाली...तर कांदा स्वस्त धान्य दुकानातून विका- पवार

कृषिकिंग, पुणे: “कांद्याचे भाव पाडून शेतक-यांना पैसे मिळू न देणे योग्य नाही. भाववाढ झाली, तर सरकारने सबसिडी द्यावी. स्वस्त धान्य दुकानांतून कांदा विक्री करावी. पण शेतक-यांचे नुकसान करू नये,” असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

‘‘भारत हा पूर्वी कापूस आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता. परंतु, बीटी कॉटनमुळे रोगप्रतिकाराची क्षमता वाढली. कीड पडणे थांबले. त्यामुळे देश दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार बनला. मात्र सध्या बीटी कॉटनवरील बोंडअळीची प्रतिकारक्षमता वाढली आहे. त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्राचे कृषी खाते, कापूस क्षेत्रातील शास्त्रज्ञ, तज्ज्ञ आणि कापूस उत्पादक शेतकरी यांची १७ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये बैठक घेणार आहे.” असेही पवार यांनी सांगितले आहे.टॅग्स