18 January 19:01

भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या


भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या

कृषिकिंग, नाशिक: कांदा उत्पादक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. मालेगाव तालुक्यातील ज्ञानेश्वर शिवणकर या शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच आपलं जीवन संपवलं. मालेगाव तालुक्यातील कंधार येथील ही घटना आहे.

कांद्याला भाव मिळेल या आशेवर शिवणकर यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला होता. मात्र कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे या शेतकऱ्याचा कांदा चाळीत खराब झाला. त्यामुळे निराश होऊन या शेतकऱ्याने आपले जीवन संपवलं आहे.

शेतात राब राब राबून जास्त उत्पादन घ्यायचं. जास्त उत्पादन घेऊनही सोन्यासारख्या शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. चांगली कसदार जमीन आणि भरपूर पाणी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतोय. गेल्या २४ तासात नाशिक जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.