29 January 12:03

भाव पाडून सरकार शेतकऱ्यांचे खून करतंय- बच्चू कडू


भाव पाडून सरकार शेतकऱ्यांचे खून करतंय- बच्चू कडू

कृषिकिंग, नाशिक: सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. कांदा पीक जोमात असताना सरकारने तेव्हा बाहेरून ५० हजार टन कांदा मागवला. त्यामुळे कांदा दरात मोठी घसरण झाली असून, कांदा १ ते २ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. भाव पडल्याने खर्चही फिटेनासा झाल्याने निराशाग्रस्त झालेले शेतकरी आत्महत्या करत आहेत. या आत्महत्या नसून, सरकारने केलेले खून आहेत. असा घणाघात आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर केला आहे.

प्रहार शेतकरी संघटनेकडून नाशिक जिल्ह्यातील येवला बाजार समिती आवारात आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. चांदवड येथे कांदा अनुदानासाठी झालेल्या आंदोलनात राज्य सरकार २०० रुपये अनुदान देणार, आणि उर्वरित ३०० रुपये अनुदानासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल. असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, अजूनही या सरकारला केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यास वेळ मिळाला नाही. असेही कडू यांनी यावेळी सांगितले आहे.टॅग्स