01 February 12:46

भाव न मिळाल्याने ३ ट्रॅक्टर कांदा रस्त्यावर ओतला; पाहा कुठं घडली ही घटना


भाव न मिळाल्याने ३ ट्रॅक्टर कांदा रस्त्यावर ओतला; पाहा कुठं घडली ही घटना

कृषिकिंग, धुळे: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कसारे गावातील शेतकऱ्यांच्या कांद्याला गुरुवारी साक्री बाजारपेठेत प्रति क्विंटलला १०० ते १५० रुपये भाव मिळाला. यामुळे संप्तत झालेल्या शेतकऱ्यांनी साक्री येथील मुख्य रस्त्यावर ३ ट्रॅक्टर कांदा फेकल्याची घटना समोर आली आहे. यामुळे सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत रस्त्यावर कांदा दिसत होता.

दरम्यान, नंदुरबारच्या खासदार हिना गावित व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत ग्रामस्वराज्य मेळाव्याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता कसारे गावात होणार होता. त्यासाठी बाजारपेठेजवळ मंडपही टाकण्यात आला होता. याची माहिती शेतकऱ्यांना समजताच त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करून गेल्या साडेचार वर्षांत खासदार या मतदारसंघात आल्याच नाही. मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. मग, त्यांना गावात येण्याचा काहीही अधिकारी नसल्याची भूमिका घेत ग्रामस्थांनी एकत्र येत अखेर लोकप्रतिनिधींना विरोध दर्शविला. मात्र, दुपारी उशिरा लोकप्रतिनिधींनी गावात येऊन कार्यक्रम आटोपून माघारी परतले.

धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी गंभीर दुष्काळ असताना शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.



टॅग्स