11 December 11:43

भाव कोसळल्याने शेतकरी कंपन्या कांदा खरेदी करणार


भाव कोसळल्याने शेतकरी कंपन्या कांदा खरेदी करणार

कृषिकिंग, पुणे: कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी रस्त्यावर माल टाकताहेत. त्यामुळे कोसळणारे दर रोखण्यासाठी शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेतला असून, येत्या दोन महिन्यांत ५ हजार टन कांदा खरेदी करण्याचा संकल्प सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीला शेतकऱ्यांनीच स्थापन केलेल्या कंपन्या धावून आल्याचे चित्र आहे.

गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारातील कांद्याचे भाव कोसळत आहेत. काही ठिकाणी अगदी ५ रुपये किलोपर्यंत बाजार भाव आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने मोफत कांदा वाटपाचे आंदोलनही शेतकऱ्यांनी केले. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवारी पुण्यात झाली.

या बैठकीत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कांदा खरेदी करुन तो कांदा लागवड कमी असलेल्या अथवा नसलेल्या ठिकाणी विकावा असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महा-एफपीसीच्या वतीने देण्यात आली आहे.टॅग्स