11 February 10:05

भारतीय द्राक्षांना युरोपमध्ये यंदा संधी, वाचा हा मार्केट रिपोर्ट


भारतीय द्राक्षांना युरोपमध्ये यंदा संधी, वाचा हा मार्केट रिपोर्ट

कृषिकिंग मार्केट रिसर्च: युरोपात सध्या द्राक्षांची आवक कमी आहे. तसेच पेरू आणि चिली या प्रतिस्पर्धी देशांतील द्राक्षांपेक्षा भारतीय पांढऱ्या प्रजातीच्या द्राक्षांचे दर (११-१२ युरो) कमी आहेत. तर पेरू देशातून येणारी रेड ग्लोब व्हरायटीची द्राक्ष १५-१६ युरो असा दर मिळवत आहेत. त्यामुळे भारतीय द्राक्षांना युरोपियन बाजारपेठेत निर्यातीसाठी यावर्षी मोठी संधी आहे.
 
भारतातील द्राक्ष उत्पादन व निर्यात- महत्वाची आकडेवारी:
चालू हंगामात देशातील १,३८,००० हेक्टरमधून ३० लाख टन उत्पादन अपेक्षित असून, यापैकी महाराष्ट्रात ८० टक्के उत्पादन होते. एकूण उत्पन्नापैकी ९० टक्के माल हा देशांतर्गत वापरला जातो. तर उर्वरित १० टक्के माल हा निर्यात केला जातो. यामध्ये नेदरलँडला ४० टक्क्यांहून अधिक, इंग्लंड १५ टक्के, रशिया १० टक्के व काही प्रमाणात संयुक्त अरब अमिराती आणि बांग्लादेशातही द्राक्ष निर्यात होतो. २०१६-१७ मध्ये देशाला द्राक्ष निर्यातीतून १४६३ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.टॅग्स