20 October 14:50

भारतीय द्राक्ष व डाळिंबाच्या आयातीवरील निर्बध हटवावेत- कृषिमंत्री


भारतीय द्राक्ष व डाळिंबाच्या आयातीवरील निर्बध हटवावेत- कृषिमंत्री

कृषिकिंग, नवी दिल्ली: अमेरिकेने भारताकडून द्राक्ष आणि डाळिंबाची आयात करण्याची इच्छा व्यक्त केली असून, ती पुढील नोव्हेंबर महिन्यापासून लवकरच करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राजदूत केनेथ आई जस्टर व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी अमेरिकेकडून भारतीय ताजी द्राक्ष आणि डाळिंबाच्या आयातीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांबाबत चर्चा केली. आणि लावण्यात आलेले आयात निर्बध हटवण्याची मागणी केली. त्यास अमेरिकेचे राजदूत केनेथ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कृषी राधामोहन सिंह यांनी यावेळी सांगितले आहे की, "या बैठकीचा मुख्य उद्देश हा अमेरिकेसोबत सुलभ व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढवत नवीन संधी उपलब्ध करणे हा होता. ज्याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत केले जाईल."टॅग्स