20 August 16:40

भारतीय उन्हाळ कांदा भाव खाणार


भारतीय उन्हाळ कांदा भाव खाणार

कृषिकिंग, पुणे/नाशिक: चीनमध्ये पाऊस झाला आहे, तसेच कर्नाटकमधील बंगळुरू रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्याही काढणीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे साठवणुकीतील भारतीय कांदा येत्या काळात भाव खाणार आहे. तसेच दुसरीकडे ऐन पावसाळयात पावसाने दडी मारल्याने राज्यातील पोळ (खरीप) कांद्याची लागवड रखडली आहे. आता श्रावणसरींच्या भरवशावर शेतकऱ्यांनी लागवडीला सुरुवात केली असून, नोव्हेंबर हा कांदा बाजारात येताच चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

श्रावणातील दोन दिवसांच्या पावसाने उभारी मिळालेल्या शेतकऱ्यांना कांदा लागवडीला सुरुवात केली आहे. उन्हाळ कांदा नोव्हेंबरपर्यंत संपत येईल, अशा काळात पोळ कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल. आणि पर्यायाने या कांद्याखेरीज ग्राहकांकडे दुसऱ्या कांद्याचा पर्याय राहणार नाही. लागवडीला विलंब झाल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत २० सप्टेंबर लागवड उरकावी लागणार आहे. अर्थात त्यासाठी पावसाची साथ लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात सध्यस्थितीत कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव, येवला, चांदवड, सिन्नर, निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी लक्ष केंद्रित केले आहे.टॅग्स