14 November 16:42

भारत कापसाला मर्यादेपेक्षा अधिक सबसिडी देतोय; अमेरिकेचा आरोप


भारत कापसाला मर्यादेपेक्षा अधिक सबसिडी देतोय; अमेरिकेचा आरोप

कृषिकिंग, नवी दिल्ली: "भारताकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बाजार मूल्य समर्थन (एमपीएस) अर्थात सबसिडीविरोधात अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्लूटीओ) धाव घेतली आहे. यासंदर्भांतील एक निवेदन अमेरिकेकडून डब्लूटीओच्या कृषीविषयक समितीला सादर करण्यात आले आहे." अशी माहिती अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाइटथायझर आणि कृषी सचिव सनी पेरेदे यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे.

कृषी पद्धतीवरील डब्ल्यूटीओच्या करारानुसार, कापसासाठी भारताकडून देण्यात येणारी सबसिडी ही निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे. असे अमेरिकेचे म्हणणे आहे.टॅग्स