10 June 06:15

भाज्यांच्या किंमतीत ७० टक्क्यांनी घट


भाज्यांच्या किंमतीत ७० टक्क्यांनी घट

कृषिकिंग, नवी दिल्ली: राष्ट्रीय नमुना पाहणी सर्वेक्षणानुसार, भाज्यांच्या घाऊक बाजारातील किरकोळ किंमतीत मे २०१७ ते जून २०१७ या काळात ७० टक्क्यांनी घट झाली आहे.

मे २०१७ मध्ये असणारा बटाट्याचा घाऊक बाजारातील दर हा १४३८ रुपये प्रति क्विंटल होता, तो जून २०१७ मध्ये ४५०
रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आला. म्हणजेच मे २०१४ च्या तुलनेत बटाट्याचा दर वजा ६९ टक्के आहे. तर मे २०१७ मध्ये असणारा कांद्याचा घाऊक बाजारातील दर हा १०६३ रुपये प्रति क्विंटल होता, तो जून २०१७ मध्ये ७५० रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आला आहे. म्हणजेच मे २०१४ च्या तुलनेत कांद्याचा घाऊक बाजारातील दर वजा ३० टक्के आहे.