06 August 07:00

भाजीपाला सल्ला: रांगडा कांदा लागवड तयारी


भाजीपाला सल्ला: रांगडा कांदा लागवड तयारी

रांगडा कांदयाच्या रोपाची लागवड ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करावी लागते व ब-याच शेतकरी बांधवांची कांदा रोपे आता रोपवाटीकेत लागवड पूर्व अवस्थेत असतील. कारण लागवडीच्या वेळेस रोपे 6 ते 8 आठवडयाची असणे जरूरीचे असते. बसवंत - 780, अॅग्री फाउंड लार्इट रेड, भिमा सुपर हे अनुक्रमे फिक्कट गुलाबी व पांढ-या कांदयाचे सुधारीत वाण आहेत. 2 × 1 मीटर आकाराचे व 15 ते 20 सेंमी उंचीचे एकूण 22 ते 25 गादीवाफ्याचे रोपे 1 हेक्टर लागवडीकरीता पुरेसे होते.
डॉ. एस.एम. घावडे, मिरची व भाजीपाला संशोधन विभाग,डॉ.पं.दे.कृ.वि.अकोलाटॅग्स