25 December 07:00

भाजीपाला सल्ला: कांदा रोपवाटीकेची काळजी घ्या


भाजीपाला सल्ला: कांदा रोपवाटीकेची काळजी घ्या

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८
रोपवाटीकेतील माना टाकणा-या रोगापासुन कांदा रोपांचे संरक्षण करण्याकरीता, लागवडीपूर्वी बियाण्याला प्रती किलो ३ ते ४ ग्रॅम कार्बेन्डाझिम हे औषध चोळावे, तसेच २५ ते ३० ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशी गांडुळ खत किंवा कुजलेल्या शेणखतात प्रती वाफा मिसळुन दयावे. या सपाट वाफ्यात १० X १० सेमी अंतरावर रोपांची लागवड करावी. बीबीएफ वाफ्यावर सुध्दा १० X १० सेमी अंतरावर लागवड करावी. लागवडीपुर्वी सपाट वाफ्यात हलके पाणी देउन नंतरच लागवड करावी. कांदयाच्या रोपाला खतपुरवठा भरपुर प्रमाणात करावा लागतो. विदर्भ विभागासाठी हेक्टरी १०० किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद दयावे. लागवडीचे वेळी संपुर्ण स्फुरद आणि अर्धे नत्र द्यावे. राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी दयावे. खते दिल्यानंतर पिकाला हलके पाणी दयावे.

डॉ. एस.एम. घावडे मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82