28 January 07:00

भाजीपाला सल्ला: असे वाढवा कांद्याचे उत्पादन..


भाजीपाला सल्ला: असे वाढवा कांद्याचे उत्पादन..

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८

कांदयाच्या जास्तीत जास्त उत्पादनाकरीता हेक्टरी १०० किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद दयावे. हया खताच्या मात्रेपैकी अर्धे नत्र व संपुर्ण स्फुरद लागवडीच्यावेळी व राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी दयावी. पिकांच्या पाण्याच्या पाळया गरजेनुसार दयाव्यात.
कांदा पिकांवर प्रामुख्याने फुलकिडयांचा तीव्र प्रादुर्भाव आढळुन येतो. या किडयांच्या नियंत्रणाकरीता पहिली फवारणी लागवडीनंतर २ ते ३ आठवडयांनी करावी. फवारणीमध्ये क्विनॉलफॉस ३५ टक्के १५ मिली किंवा फॉस्फोमिडॉन ८५ टक्के १५ मिली किंवा मॅलाथिऑन ५० टक्के १० मिली किंवा मोनोक्रोटाफॉस ३६ टक्के ११ मिली यापैकी कोणतेही किटकनाशक सुचविलेल्या प्रमाणात १० लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. आवश्यकतेनुसार २ ते ३ आठवडयांनी वरीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. प्रत्येक फवारणीच्या वेळी द्रावणात ५० मिली सॅन्डोव्हिट किंवा ट्रायटॉन (स्टीकर) मिसळावे.

-डॉ. एस.एम. घावडे , मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82टॅग्स