22 December 07:00

भाजीपाला सल्ला: अशी करा कांदा रोप लागवडीपूर्व तयारी


भाजीपाला सल्ला: अशी करा कांदा रोप लागवडीपूर्व तयारी

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८
कांदयाच्या रोपांच्या लागवडीची तयारी
कांदयाचे रोप ६ ते ८ आठवडयाचे झाल्यावर लागवडी योग्य होते. कांदयाच्या रोपांचे स्थलांतर जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवडयात करावे. लागवडीकरीता मध्यम ते भारी परंतु उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. शेतात आडवी उभी नांगरणी केल्यानंतर ढेकळे फोडून झाल्यावर वखरणी करावी. नंतर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी १०-१२ टन टाकावे. पुन्हा वखरणीची पाळी दयावी. २ X १ मी. किंवा ३ X १.५ मी. आकाराचे सपाट वाफे तयार करावेत किंवा ठिबक सिंचनाची सोय उपलब्ध असणा-या शेतकरी बंधूनी १.२० मीटर रूंदीचे बीबीएफ वाफे तयार करावे तसेच या वाफ्यावर १० सेंमी अंतरावर खोल रेषा पाडुन घ्याव्यात. यानंतर फोरेट १० टक्के ३ ते ३.५ सेंमी खोलीवर टाकुण त्यावर माती झाकावी. त्यानंतर शक्य तितक्या कमी प्रमाणात (पातळ) बियाण्याची रोपवाटीकेत पेरणी करावी. फोरेट आणि बियाणे यांचा एकमेकांशी संबंध येणार नाही याची काळजी घ्यावी.

डॉ. एस.एम. घावडे मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82