03 December 10:05

बाजार समिती बरखास्तीचा निर्णय चिंताजनक- पवार


बाजार समिती बरखास्तीचा निर्णय चिंताजनक- पवार

कृषिकिंग, सिंधुदुर्ग: ‘कोकणातील आंबा, काजूला योग्य मार्केट मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शासनाचा कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीचा निर्णय चिंताजनक आहे. याचे सहा महिन्यांत परिणाम दिसून येतील; शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घातक ठरेल.’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले आहे.

पवार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आंबोली, सावंतवाडी, मालवण येथे भेटी दिल्यानंतर येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आंबा, काजू बागायतदार व शास्त्रज्ञ मंच सिंधुदुर्ग यांच्यातर्फे आंबा, काजूविषयक चर्चासत्र झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पवार यांनी आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट दिली. ऊस शेतीच्या संयोजनाची माहिती घेत बिटापासून साखर तयार करण्याच्या प्रयोगावर चर्चा केली. तसेच वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट दिली.टॅग्स