02 February 11:46

बांग्लादेशकडून द्राक्ष आयातीत कपात; निर्यातदार चिंतेत


बांग्लादेशकडून द्राक्ष आयातीत कपात; निर्यातदार चिंतेत

कृषिकिंग, नवी दिल्ली: “बांग्लादेशने द्राक्ष आयातीवरील शुल्कात वाढ करत, आयातीत मोठी कपात केल्यामुळे भारतीय द्राक्ष निर्यातदार चिंतेत आहे. आयात शुल्कातील वाढीमुळे द्राक्ष निर्यातदारांना येणाऱ्या खर्चात प्रति किलो ५५ रुपयांपर्यंत वाढ झाली असून, बांग्लादेशकडून करण्यात येणाऱ्या द्राक्ष निर्यातीत मोठी घट झाल्यामुळे निर्यातदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या प्रश्नी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून द्राक्ष निर्यातीला चालना द्यावी.” अशी मागणी अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष गगनदादा खापरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

गेल्या वर्षी भारताने बांगलादेशला सुमारे १५ हजार टन द्राक्षे निर्यात केली होती. अशी माहिती महाराष्ट्र फळबाग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय द्राक्ष निर्यातदारांना कोलकाता येथून भूमार्गाने द्राक्ष पाठवताना आयात कर, व्हॅट आणि इतर कर भरण्याची आवश्यकता नाही. परंतु बांग्लादेशाने वाढीव आयात शुल्क लागू केल्यामुळे भारतीय निर्यातदार चिंतेत आहे. असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

चालू हंगामात आतापर्यंत भारताने चीनला सुमारे ३००० टन, तर रशिया, मलेशिया आणि सिंगापूर या देशांना सुमारे १५०० टन द्राक्ष निर्यात केली आहे. तर मागील हंगामात भारताने सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या रशियाला २७ हजार ५५४ टन द्राक्ष निर्यात केली होती.टॅग्स