28 January 10:45

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे अनुदान जमा होणार


फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे अनुदान जमा होणार

कृषिकिंग, पुणे: कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्यासाठी बाजार समित्यांमार्फत २५ जानेवारीपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व काही खासगी बाजार समितीमध्ये १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांद्याची विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. यासाठी येत्या २५ जानेवारीपर्यंत बाजार समित्यांमध्ये अर्ज स्वीकारण्यात आले आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे.टॅग्स