04 July 08:30

फळे-भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ३४ टक्के


फळे-भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ३४ टक्के

कृषिकिंग, पुणे: देशाच्या फळे आणि भाजीपाला निर्यातीचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र करीत असल्याचे समोर आहे. २०१७ या वर्षाच्या शेवटी देशातून ३ हजार ११३ कोटी रुपयांची ३ लाख ५१ हजार ८३३ टन प्रक्रियायुक्त फळे निर्यात झाली आहेत. त्यात महाराष्ट्राचा वाटा ३४ टक्के असून, त्याचे मुल्य १ हजार ५४ कोटी रुपयांचे आहे. ताज्या फळांच्या निर्यातीत जवळपास ४ लाख ९ हजार ९३८ टनांची निर्यात झाली असून, त्याचे मूल्य एक हजार ८५८ कोटी रुपयांचे होते. ज्यामध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा १ लाख २८ हजार टनांचा (मूल्य ८०५ कोटी रुपये) आहे.

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी व निर्यातदारांनी देशाच्या फळनिर्यातीला दिशादर्शक असे काम गेल्या दशकभरात उभे केले आहे. २०१६-१७ या एका वर्षात १ हजार ९६० कोटी रुपयांची १ लाख ८७ हजार २८७ कोटी रुपयांची द्राक्षे राज्यातून निर्यात झालेली आहेत. राज्याची वार्षिक आंबा उलाढाल देखील पावणे चारशे कोटी रुपयांची असून डाळिंब निर्यातीचे मूल्यदेखील जवळपास चारशे कोटीच्या आसपास गेली आहे. भाजीपाल्यात देखील सात पिकांच्या निर्यातीत राज्य पहिल्या क्रमांकावर असून त्यात कांदा निर्यात पावणेदोन हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. राज्यात गेल्या वर्षी मधुमक्याची निर्यात ५० कोटीची तर समिश्र भाजीपाला निर्यात १७० कोटी रुपये मूल्याची झाली होती.

राज्य शासनाने निर्यातीची क्षमता ओळखून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निर्यात प्रोत्साहन कक्ष उघडण्याची गरज आहे.’’ असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.