01 September 14:50

फलोत्पादनात वाढ; मात्र कांदा, टोमॅटो, बटाटा उत्पादनात घट होण्याची शक्यता


फलोत्पादनात वाढ; मात्र कांदा, टोमॅटो, बटाटा उत्पादनात घट होण्याची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: कृषी मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंदाजानुसार, २०१७-१८ च्या पीक वर्षात देशातील फलोत्पादनात वाढ होऊन ते ३०.६८ कोटी टन इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या पीक वर्षात देशातील फलोत्पादन ३०.०६ कोटी टन इतके नोंदवले गेले होते. म्हणजेच फळे आणि भाजीपाल्याच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २.०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, असे असले तरी कांदा, टोमॅटो, आणि बटाटा या प्रमुख भाजीपाला पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

२०१७-१८ च्या पीक वर्षात मसालावर्गीय पिकांचे उत्पादन ८३.६९ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या पीक वर्षात ८१.२२ लाख टन इतके नोंदवले गेले होते. मसाला पिकांमध्ये लाल मिरचीचे उत्पादन २३.०१ लाख टन, धनाचे उत्पादन ८.६१ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या पीक वर्षात अनुक्रमे २०.९६ लाख टन आणि ८.८१ लाख टन इतके नोंदवले गेले होते. जिऱ्याचे उत्पादन मागील वर्षीच्या ४.९३ लाख टनांवरून वाढून ५ लाख टन, लसूणचे उत्पादन मागील वर्षीच्या १६.९३ लाख टनांवरून वाढून १७.२१ लाख टन होण्याची शक्यता आहे. तर हळदीचे उत्पादन मागील वर्षीच्या १०.५६ लाख टनांवरून वाढून १०.७७ लाख टन इतके होण्याची शक्यता आहे.

कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०१७-१८ च्या पीक वर्षात भाजीपाला पिकांचे उत्पादन १७.९६ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या पीक वर्षात १७.८१ कोटी टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या पीक वर्षात १७.८१ लाख टन नोंदवले गेले होते. भाजीपाला पिकांमध्ये कांद्याचे उत्पादन २२०.७१ लाख टन इतके होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या पीक वर्षात २२४.२७ लाख टन इतके नोंदवले गेले होते. याचप्रमाणे बटाटा आणि टोमॅटोच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे.