11 February 12:31

फडणवीस ‘बोगस माणूस’, सदाभाऊ ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’- राजू शेट्टी


फडणवीस ‘बोगस माणूस’, सदाभाऊ ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’- राजू शेट्टी

कृषिकिंग, कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘बोगस माणूस’, मंत्री सदाभाऊ खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. ते कोल्हापुरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

स्वातंत्र्यानंतर देशात ज्या-ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या गरिबी हटाओ व पाकिस्तानच्या मुद्यावर लढल्या गेल्या; पण २०१९ ची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढली जाणार आहे. ही ताकद शेतकरी नेत्यांच्या एकजुटीबरोबर चळवळीची असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापुरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी महाविद्यालयीन तरुणांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. त्यामध्ये ‘रॅपिड फायर’मध्ये ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर फडणवीस ‘बोगस माणूस’, खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचे उत्तर त्यांनी दिले.