27 December 11:49

फडणवीस सरकारने भाजपच्या दोन नेत्यांचे ५९ लाख रुपये केले माफ


फडणवीस सरकारने भाजपच्या दोन नेत्यांचे ५९ लाख रुपये केले माफ

कृषिकिंग, मुंबई: एकीकडे राज्यभरात दुष्काळी परिस्थिती आणि राज्याच्या तिजोरीत पैश्यांची चणचण भासत असताना फडणवीस सरकारने भाजपच्या दोन नेत्यांचे चक्क ५९ लाख रुपये माफ केल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या अर्जातून ही माहिती समोर आली आहे. ज्यानुसार एकनाथ खडसे यांचे १५.४९ लाख तर डॉ.विजयकुमार गावित यांचे ४३.८४ लाख माफ करण्यात आले आहे. तशा सूचना सार्वजनिक बांधकाम खात्यास देण्यात आल्या आहेत.

एकनाथ खडसे हे मंत्री असताना रामटेक बंगल्यावर राहत होते तर डॉ. विजयकुमार गावित हे आघाडी सरकारच्या काळात सुरूची सदनिकेमध्ये राहत होते. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतरही काही दिवस बंगला रिक्त केला नाही. त्याचे एकूण १५ लाख ५० हजार रूपये भाडे थकीत होते. त्याचबरोबर विजयकुमार गावित यांचे ४३ लाख ८४ हजार ५०० रूपये भाडे थकीत होते. या दोन्ही नेत्यांनी भाडे माफ करण्याची विनंती केल्यानंतर विशेष बाब म्हणून त्यांचं भाडे माफ करण्यात आलं आहे.