19 December 17:25

प्रशिक्षित शेतकऱ्यांची फौज उभारून शेतीत बदल घडवू- मुख्यमंत्री


प्रशिक्षित शेतकऱ्यांची फौज उभारून शेतीत बदल घडवू- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानातून प्रशिक्षित शेतकऱ्यांची फौज उभी करून शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून दाखवू. शेती क्षेत्रात एक नवी पहाट या माध्यमातून आपण आणत आहोत. खूप मेहनतीतून हा कार्यक्रम आखला आहे. आपण यामध्ये झोकून देऊन काम केले पाहिजे आणि यातून नवे मॉडेल तयार होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी कुशल प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी-पाटील निलंगेकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील उपस्थित होते.

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानाअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांनी गटशेती करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. गटशेती करूया आणि संघटित होऊया असे आवाहन करत गटशेतीतून कौशल्य आणि समृद्धीचा मूलमंत्र देण्यात येणार आहे. राज्यभरातील ३ लाख शेतकऱ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.