30 June 09:30

प्रभावहीन मॉन्सूनमुळे पेरणीत घट


प्रभावहीन मॉन्सूनमुळे पेरणीत घट

कृषिकिंग, पुणे: मॉन्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आणि गुजरातमध्ये खरीप पिकांच्या पेरणीत मोठी घट झाली आहे. तसेच पेरणीला अनुकूल पाऊस नसल्यामुळे या राज्यांतील शेतकरी चिंतीत आहे. हवामान विभागाने (आयएमडी) सरासरी ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, गेल्या काही दिवसात मॉन्सूनचा योग्य प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आणि गुजरात या राज्यांमधील काही ठिकाणी खरीपाची पेरणी लांबली आहे. तर, काही ठिकाणी पेरणीचा वेग पूर्णपणे मंदावला आहे.

खाद्यतेल उत्पादक महासंघ आणि सॉईल एक्सट्रैक्टर्स एसोसिएशनने मॉन्सूनबाबत चिंता व्यक्त करताना सांगितले की, मॉन्सून या राज्यांमध्ये प्रभावहीन ठरत असून तो सध्या या राज्यांना ओलांडून पुढे जात आहे. ही राज्य सोयाबीन उत्पादनात प्रमुख राज्य आहेत. त्यामुळे या राज्यांतील सोयाबीन लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित होण्याची शक्यता आहे.