28 June 10:27

पुढील २४ तासांत मुंबईसह देशभरात जोरदार पावसाची शक्‍यता


पुढील २४ तासांत मुंबईसह देशभरात जोरदार पावसाची शक्‍यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: पुढील २४ तासांत देशातील २२ राज्‍यांमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता भारतीय हवामानशास्र विभागाने वर्तविली आहे. तर येत्‍या काही तासांत उत्‍तर प्रदेशातील 16 जिल्‍ह्यांना वादळी पाऊस बरसण्‍याची शक्‍यता आहे. याविषयी प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, ओरिसा, उत्‍तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, अासाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्किम, झारखंड, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्‍यांत पुढील २४ तासांत जोरदार पावसाची शक्‍यता आहे.

पुढील काही तासांत उत्‍तर प्रदेशच्‍या मथुरा, अलीगड, हाथरस, लखीमपुरखीरी, सीतापूर, शाहजहांपुर, जालौन, इटावा, औरैया, गोंडा, बस्ती, फैजाबाद, आंबेडकर नगर, सिद्धार्थनगर, बलरामपूर आणि सुल्तानपूर या ९ जिल्‍ह्यात वादळासह पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच श्रावस्ती, खीरी, पीलीभीत, बरेली, रामपूर, शाहजहांपूर, मुरादाबाद आणि बिजनौर या जिल्‍ह्यातली जोरदार सरी बरसण्‍याची शक्‍यता आहे.

दक्षिण-पश्चिम मान्‍सून राजस्‍थानपर्यंत आला आहे. पुढील ४८ तासांत मान्‍सून पुर्ण राजस्‍थानला व्‍यापून घेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्‍सून उत्‍तरेकडे सरकण्‍यासाठी स्थिती अनुकूल असल्‍याचे हवामान विभागाने सांगितले आहे. आणि पुढील ४८ तासांत तो ऊत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत पोहोचण्‍याची शक्‍यता आहे.



टॅग्स