10 October 10:24

पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता


पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: “सुरुवातीच्या काळात पावसाने काही प्रमाणात उघडीप घेतली असली, तरी यावर्षी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या राज्यात पावसाचे वातावरण असून, आजपासून पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.” असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, “मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात पावसाची दमदार हजेरी पहायला मिळण्याची शक्यता आहे. या आधीही हवामान खात्याने असाच इशारा देताना ५ ऑक्टोबरपासून १४ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामान खात्याने येत्या ४ दिवसात हा पाऊस महाराष्ट्रभर बरसू शकतो,” असे म्हटले आहे.टॅग्स