02 June 07:00

पीक सल्ला: भाजीपाला पिकांसाठी शिफारशीत वाण


पीक सल्ला: भाजीपाला पिकांसाठी शिफारशीत वाण

वेलवर्गीय भाजीपाला वर्गात मोडणा-या कारली (कोकण तारा, हिरकणी), दुधी भोपळा (सम्राट, पुसा समर प्रॉलिफिक लाँग), काकडी (पुणे खिरा, हिमांगी, फुले प्राची), वाल (दसरा, दिपाली, कोकण भूषण) या वाणांची निवड करून जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शिफारशीत अंतरावर लागवड करावी.

कंदवर्गीय भाजीपाला वर्गात मोडणा-या खरीप कांदा (बसवंत - 780, एएफएलआर) हळद (पिकेव्ही वायगाव, सेलम), आले (रीओदिजेनेरो, सुप्रभा) यापैकी उपलब्ध वाण निवडून शिफारशीत अंतरावर योग्य ओलीत व्यवस्थापनात लागवड करावी.
डॉ. एस.एम. घावडे, मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि.अकोला