08 August 07:00

पीक सल्ला: कांद्यावरील ॲस्टर यलो रोगाचे नियंत्रण


पीक सल्ला: कांद्यावरील ॲस्टर यलो रोगाचे नियंत्रण

ॲस्टर यलो: हा रोग मायक्राप्लाझामुळे होतो. रोगाची सुरुवात नवीन पानाच्या बुडापासून होते. पाने चपटी व रंगाने पिवळी बनतात. त्यावर उभे हिरवे पट्टे दिसतात. पिवळेपणा पानाच्या शेंडयाकडे वाढत जाता. फुलांचे दांडे बारीक व पातळ होतात. फुलांचा गुच्छ नेहमीप्रमाणे भरलेला न राहता लहान राहतो. त्यातील काही फुलांचे देठ लांबतात. व सर्व फुले एका पातळीत राहत नाहीत.

नियंत्रणाचे उपाय: हा रोग रस शोषून घेणाऱ्या किडींमार्फत पसरतो. किडींचा बंदोबस्त वरीलप्रमाणे करणे आवश्यक असते. रोगग्रस्त झाडे किंवा कांदे त्वरीत उपटून नष्ट करावीत. बियाणे पिकात अशी झाडे आढळल्यास ती उपटून नष्ट करावीत.

डॉ.कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे.
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.टॅग्स