20 July 07:00

पीक सल्ला: कांद्यावरील मुळकुज रोगाचे नियंत्रण


पीक सल्ला: कांद्यावरील मुळकुज रोगाचे नियंत्रण

मुळकुज: हा रोग बहुतेक कांदा उत्पादक भागात आढळतो. विशेषत: अधिक तापमान आणि आर्द्रता असणाऱ्या भागात या रोगाची तीव्रता अधिक असते. हा रोग फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे कांद्याची पाने पिवळी पडतात. व पिवळेपण बुडख्याकडे वाढत जातो. नंतर पाने सुकून कुजतात. महाराष्ट्रात खरीप हंगामात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या रोगाची तीव्रता सर्वाधिक असते.

नियंत्रणाचे उपाय:
या रोगाची बुरशी जमिनीत राहते. त्यामुळे पिकाची फेरपालट करणे महत्वाचे ठरते. जमिनीची खोल नांगरट करुन उन्हाळयात तापू द्यावी. थायरम हे बुरशीनाशक चोळून बी पेरणे (एक किलो बियांसाठी दोन ग्रॅम थायरम हे प्रमाण वापरावे.

डॉ. कुणाल सुर्यवंशी आणि श्रीमती श्वेता शेवाळे
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.टॅग्स