07 August 07:00

पीक सल्ला: कांद्यावरील पिवळ्या बुटका रोगाचे नियंत्रण


पीक सल्ला: कांद्यावरील पिवळ्या बुटका रोगाचे नियंत्रण

पिवळा बुटका रोग: हा विषाणुजन्य रोग कांदा, लीक लसुण इत्यादी पिकांवर येतो. कांद्याची झाडे बुटकी राहतात. पाने वाकडी होतात. पिवळी पडतात. पिवळेपणाची तीव्रता काही छटपासून तर संपुर्ण पान पिवळे होण्यापर्यत असते. पाने चपटी आणि कडक होतात आणि वाकतात. फुलांचे दांडे बारीक राहतात व त्यावरही पिवळेपणा येतो.

नियंत्रणाचे उपाय: विषाणु पसरवणाऱ्या किडीसाठी पिकांवर 0.3 टक्के डायमेथोएट 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डॉ.कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे.
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.टॅग्स