21 July 07:00

पीक सल्ला: कांद्यावरील तळकुजव्या रोगाचे नियंत्रण


पीक सल्ला: कांद्यावरील तळकुजव्या रोगाचे नियंत्रण

तळकुजव्या: फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम या जमिनीत राहणाऱ्या बुरशीमुळे होतो. जमिनीत अधिक ओलावा, कांदे काढणीचे वेळ पाऊस प्रसार होतो. बिजोत्पादन क्षेत्रातही या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाची सुरुवात पाती पिवळी पडून होते. रोपांची वाढ थांबून पात हळूहळू सुकू लागते आणि सडण्याची क्रिया सुरु होऊन नंतर जमिनीखालील भाग सडून पूर्ण रोप मरुन जाते.

नियंत्रणाचे उपाय: एक वर्षासाठी पिकाची फेरपालट करावी. ट्रायकोर्डमा विरिडी जैविक बुरशी 1250 ग्रॅम प्रति 125 किलो शेणखतात. मिसळून कांदा लावण्याच्या अगोदर शेतात मिसळावी. कार्बेन्डॅझिम प्रति लिटर एक ग्रॅम या प्रमाणात द्रावण तयार करुन त्यामध्ये बिजोत्पादनासाठी लावावयाचे कांदे दहा मिनिटे बुडवून नंतर लावावे. कार्बेन्डॅझिम किंवा बेनलेट एक ग्रॅमप्रमाणे किंवा कॅप्टान दोन ग्रॅम प्रती लिटर प्रमाणे कांदे काढणीच्या 20 आणि 10 दिवस अगोदर पिकामध्ये फवारणी केल्यास साठवणीत या रोगाचा प्रसार होत नाही.

डॉ.कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय,नाशिक.टॅग्स