22 July 07:00

पीक सल्ला: कांद्यावरील तपकिरी करप्याचे नियंत्रण


पीक सल्ला: कांद्यावरील तपकिरी करप्याचे नियंत्रण

तपकिरी करपा: हा रोग स्टेम्फिलियम व्हॅसिकॅरियम या नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच बियाण्याच्या पिकावर मोठया प्रमाणात होतो. पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसू लागतात. चट्टयांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. फुलांच्या दांडयावर हा रोग आल्यास फुलांचे दांडे मऊ होतात व त्या जागी वाकून मोडतात. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रब्बी हंगामात होतो. 15 ते 20 अंश सें. तापमान व 80 ते 90 टक्के आर्द्रता यामुळे बुरशीची वाढ झपाटयाने होते. फेब्रुवारी -मार्च महिन्यात पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण राहिले तर रोगाचा प्रसार जोरात होतो. उत्तर हिंदुस्थानात रब्बी हंगामातील वातावरण राहिले तर रोगास फारच पोषक ठरते. हिवाळी पावसामुळे रोगाचे प्रमाण जास्त वाढते. बियाण्याच्या पिकास त्यामुळे मोठा प्रादुर्भाव होत असल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात बियाणे पिकाचे 80-90 टक्के नुकसान होते.

नियंत्रणाचे उपाय: वातावरण उपयुक्त ठरत असल्यामुळे बुरशीनाशके प्राभावीपणे काम करु शकत नाहीत. तरीही पिकांची फेरपालट, बीजप्रक्रिया रोपे लावताना कार्बेन्डॅझिमच्या द्रावणाचा वापर इत्यादी बाबींमुळे रोगाची तीव्रता कमी करता येते. दर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने 0.2 टक्के कार्बेन्डॅझिम ची फवारणी करावी.

डॉ. कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय,नाशिक.टॅग्स