03 August 07:00

पीक सल्ला: कांद्यावरील केवडा रोगाचे नियंत्रण


पीक सल्ला: कांद्यावरील केवडा रोगाचे नियंत्रण

परनोस्पोरा डिस्ट्रक्टर या नावाच्या बुरशीमुळे केवडा रोग होतो. सर्वप्रथम झाडाच्या पानांवर किंवा फुलांच्या दांडयावर 5 ते 6 इंच लांबीचा भुरीचा पिवळसर पांढरट डाग दिसतो. सकाळच्या दंवामध्ये डाग चटकन उठून दिसतो. पाने नंतर पिवळसर होतात. चट्टे किंवा डाग पडलेल्या भागापासून पाने किंवा फुलांचे दांडे वाकतात. कांद्याची वाढ नीट होत नाही. या बुरशीची वाढ दमट आणि काहीशा थंड हवामानात जोरात होते. उत्तर हिंदुस्थानात या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होतो. महाराष्ट्रात रब्बी हंगामात पाऊस झाला, तर क्वचितच या रोगाचा उपद्रव होतो.

नियंत्रणाचे उपाय: कॅराथेन 0.1 टक्के 10 ग्रॅम किंवा बेलेटानॅट्रायडेमार्क 0.1 टक्का 10 ग्रॅम औषध 10 लि. पाण्यात मिसळून फवारावे. किंवा पिकांची फेरपालट करावी.

डॉ.कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे.
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.टॅग्स