05 August 07:00

पीक सल्ला: कांद्यावरील काळ्या बुरशीचे नियंत्रण


पीक सल्ला: कांद्यावरील काळ्या बुरशीचे नियंत्रण

काळी बुरशी: साठवणीमध्ये हा रोग सर्वच ठिकाणी आढळून येत असतो. तरी उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात यांचा प्रादुर्भाव जास्त जाणवत असतो. हा रोग ॲस्परजिजलस नायजर या बुरशीमुळे होत असतो. या रोगाची सुरुवात ही कांदा काढणीनंतर कांद्याच्या वरच्या भागाकडून होते. कांद्याच्या वरच्या पापुद्रयाच्या आत असंख्या काळे पुंजके दिसतात. बुरशीची वाढ होऊन वरच्या एकत्रित पापुद्रयांमध्ये पोचते. कालांतराने कांद्याचा पृष्ठभाग काळा पडतो. काळी बुरशी निसर्गत: अनेक सजीव निर्जीवर वस्तुंवर वाढत राहते. दमट व उष्ण हवेत वाढ लवकर होते. चाळीतील तापमान 30 ते 35 डिग्री सें. आणि आर्द्रता 70 टक्के पेक्षा जास्त असेल तर काळी बुरशी लवकर वाढते. महाराष्ट्रात ठेवलेल्या कांद्यावर जुलै ते सप्टेंबर या काळात काळी बुरशी मोठया प्रमाणात वाढलेली दिसते.

नियंत्रणाचे उपाय: काळी बुरशी अनेक प्रकारात अनेक वस्तूंवर उपलब्ध असते. कांदा किंवा लसणासारखे आवडीचे भक्ष्य आणि योग्य वातावरण मिळाले की त्याची वाढ होते. तेव्हा कांदा पिकाच्या सर्व अवस्थेत काळजी घेणे आवश्यक असते. मानकूज रोगासाठी करावयाची उपाय योजना यासाठी लागू पडते.

डॉ.कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे.
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.टॅग्स