04 August 07:00

पीक सल्ला: कांद्यावरील काळ्या काजळीचे नियंत्रण


पीक सल्ला: कांद्यावरील काळ्या काजळीचे नियंत्रण

काजळी: हा रोग कोटिटोट्रायकम सिसिसीनान्स नावांच्या बुरशीमुळे होतो. रोगाची सुरुवात कांदा कांढणीपुर्वी काही दिवस अगोदर होत असते. आणि त्याची तीव्रता ही साठवणगृहामध्ये वाढत असते. कांद्याच्या वरच्या आवरणामध्ये लहान गर्द हिरवा किंवा काळा ठिपका पडत असतो. ठिपक्याचा आकार हा 1 इंच व्यासापर्यत वाढत जात असतो. बुरशीची रचना कमी होत जाणाऱ्या गोल कडयाच्या स्वरुपात दिसते. कधी कधी काही बुरशी पापुद्रयाच्या शिरांच्या मार्गाने पसरलेली दिसते. पांढऱ्या रंगाच्या कांद्याच्या जातीमध्ये या रोगास अधिक प्रमाणात बळी पडतात. तुलनेने लाल किंवा पिवळया कांद्यावर या रोगाचा प्रसार क्विचित होत असतो. तर तो कांद्याच्या मानेच्या भागामध्ये मर्यादित राहतो. लाल कांद्यात असणारे प्रोटोकॅटॅच्युईक आणि कॅटॅचाल हे घटक रोगाची वाढ थांबवण्यास मदत करतात.

नियंत्रणाचे उपाय: पांढऱ्या कांद्याच्या जातीचे साठवणीतील नुकसान टाळण्यासाठी कांदा काढणीपुर्वी बुरशीनाशकांची वरील इतर रोगाप्रमाणे फवारणी करावी. तसेच कांदा चांगला सुकवून साठवणगृहामध्ये भरणे.

डॉ.कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे.
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.टॅग्स