01 August 07:00

पीक सल्ला: कांद्यावरील कंद व खोड कुजविणाऱ्या सुत्रकृमींचे नियंत्रण


पीक सल्ला: कांद्यावरील कंद व खोड कुजविणाऱ्या सुत्रकृमींचे नियंत्रण

डिटीलिंकस डिपसॅसी या नावाच्या सुत्रकृमीमुळे कंद किंवा खोड कुजते या सुत्रकृमीमुळे कांदा, लसुण, कोबी, बटाटा इ. पिकात कंद किंवा खोडकूज होते. झाडाच्या कोणत्याही अवस्थेत सुत्रकृमींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नुकत्याच लावलेल्या रोपांवर कृमींचा प्रादुर्भाव झाला तर झाडे खुजी होतात. पाने वाकडी आणि पांढुरकी होतात. कंद वाढत असताना कृमींचा प्रादुर्भाव झाला तर कंदाच्या वरच्या भागाजवळील म्हणजे मानेजवळील पेशी मऊ होतात. हळूहळू कृमी कांद्यामध्ये शिरतात. त्यामुळे पेशी मऊ होऊन सडतात. व कांद्याला एक प्रकारचा घाण वास येतो. सुत्रकृमीचा प्रसार कांद्याचे बी, कांद्याच्या पाती, सडके कांदे यामार्फत होतो. बऱ्याच वेळा काही गवतावरदेखील सुत्रकृमी वाढत असतात. कांद्यामध्ये सुत्रकृमी, कंदामधून फुलांचे दांडे आणि बियांपर्यत पोचतात. असे बी पुन्हा वापरले की त्यांचा प्रसार होतो. जमिनीचे तापमान 20 ते 25 अंश सें. आणि भरपूर ओलावा अशा वातावरणात सुत्रकृमींची वाढ जोरात होते. महाराष्ट्रात खरीप हंगामात पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत नुकसान जास्त होते.

नियंत्रणाचे उपाय: तृणधान्यासोबत पिकाची फेरपालट करावी. खरीपात निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीत कांद्याची लागवड करावी.

डॉ.कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे.
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.टॅग्स