19 July 07:00

पीक सल्ला: कांद्याच्या पांढऱ्या सडीचे नियंत्रण


पीक सल्ला: कांद्याच्या पांढऱ्या सडीचे नियंत्रण

पांढरी सड: हा रोग स्क्लोरोशियम रॉल्फसी या बुरशीमुळे होतो. ही बुरशी पुनर्लागण केलेल्या रोपांच्या मुळावर वाढते. रोपांची किवा झाडांची पाने जमिनीलगत सडतात. पानांचा वरचा भाग पिवळा पडतो. वाढणाऱ्या कांद्याला मुळे राहत नाहीत. कांद्यावर कापसाप्रमाणे बुरशी वाढते. त्यावर पांढरे दाणे तयार होतात. कांदा सडतो. पांढऱ्या सडीचा प्रादुर्भाव पुनर्लागवडीनंतर लगेच झाला तर कांदा पोसत नाही. कांदा तयार झाला असेल तेव्हा कांदा सडतो. खरीप तसेच रब्बी हंगामातही या रोगाचा मोठया प्रामणात प्रादुर्भाव होतो. पाण्याचा निचरा चांगला न होणाऱ्या शेतात या रोगाची तीव्रता अधिक असते. या रोगामुळे ५० ते ६० टक्के नुकसान होऊ शकते. या रोगाची बुरशी जमिनीत बरीच वर्षे राहु शकते.

नियंत्रणाचे उपाय: रोपांच्या माध्यामातून तसेच पुर्व हंगामातील कांदा पिकामधून या बुरशीचा प्रसार होतो. मररोग होऊ नये. म्हणून जे उपाय केले जातात. त्यामुळे हा रोग टाळता येतो. एकाच शेतात वर्षानुवर्षे कांद्याची लागवड करु नये. कांद्याची तृणधान्यासोबत फेरपालट करावी. खरीपातील लागवड नेहमी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. रोपांची मुळे लागवडीपुर्वी कार्बेन्डझिम द्रावणात एक ते दोन मिनिटे बुडवून घ्यावीत. त्यासाठी 20 ग्रॅम कार्बेन्डॅझिम 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.

डॉ. कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.टॅग्स