22 April 07:00

पीक सल्ला: कांदा रोपवाटिका तयार करणे


पीक सल्ला: कांदा रोपवाटिका तयार करणे

खरीप कांद्याची रोपवाटिका तयार करताना एक हेक्टर क्षेत्रात रोपांच्या उपलब्धतेसाठी सुमारे ०.०५ हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्याची शिफारस आहे. त्यासाठी ५ ते ७ किलो बियाणे लागतात. मशागतीवेळी खोल नांगरट करून घ्यावी. त्यामुळे कीटकांचे कोष व तणांच्या बिया सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होण्यास मदत होते. वाफे तयार करण्यापूर्वी अगोदरच्या पिकांची धसकटे, काडीकचरा, तण आणि दगड काढून टाकावेत. अर्धा टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.

डॉ. शैलेंद्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.विजय महाजन भाकृअनुप- कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणेटॅग्स