27 February 14:41

पिकाला पाणी केव्हा द्यावे? सांगेल, माती ओलावा सूचक यंत्र...


पिकाला पाणी केव्हा द्यावे? सांगेल, माती ओलावा सूचक यंत्र...

कृषिकिंग, सीतापुर(उत्तरप्रदेश): सध्यस्थितीत देशातील शेतकरी आधुनिक साधनांचा वापर करून प्रगतीशील शेती करण्याच्या प्रयत्न करत आहे. परंतु. पिकांना योग्यवेळी पाणी न मिळाल्यामुळे किंवा सतत पाणी दिल्यामुळे त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. मात्र त्यासाठी आता उत्तर प्रदेशातील कटिया (सीतापूर) कृषी विज्ञान केंद्रातील संशोधकांनी माती ओलावा सूचक यंत्र तयार केले आहे. या यंत्रांच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकांना कधी आणि किती प्रमाणात पाणी देणे आवश्यक आहे, हे समजू शकणार आहे.

माती ओलावा सूचक यंत्र हे एक सर्वसाधारण यंत्र असून, त्यात असलेल्या चार रंगाच्या एलईडी बल्बच्या सहाय्याने शेतात पिकांना आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण दाखवले जाते. कृषी विज्ञान केंद्रातील संशोधक डॉ. दयाशंकर श्रीवास्तव यांनी सांगितले आहे की, आमची टीम युपीतील स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनाबाबत जागरूक, आणि त्याद्वारे पाणी बचतीचे आवाहन करण्यासाठी फिल्डवर मदत करत आहे.टॅग्स