16 June 07:15

पिंचींग आणि संजीवकाद्वारे द्राक्ष वेलींची वाढ नियंत्रित करा


पिंचींग आणि संजीवकाद्वारे द्राक्ष वेलींची वाढ नियंत्रित करा

ज्या द्राक्ष बागेत घडनिर्मितीच्या कालावधीमध्ये वाढीचा जोम जास्त आहे अशा बागेत वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता पाणी कमी करावे व नत्र बंद करावे. शेंडा खुडणे (पिंचींग) सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. यासोबत संजीवकांची फवारणी (6 बीए व युरासील शिफारशीप्रमाणे) करावी. 0:52:34 ची 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लीटर पाणी याप्रमाणे 3-4 फवारण्या 4-5 दिवसाच्या अंतराने कराव्यात.
डॉ.आर.जी.सोमकुंवर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे