04 October 09:46

पावसाळा संपणार; येत्या ४-५ दिवसांत राज्यातून मॉन्सून माघारी फिरणार


पावसाळा संपणार; येत्या ४-५ दिवसांत राज्यातून मॉन्सून माघारी फिरणार

कृषिकिंग, पुणे: "उत्तर भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेला मॉन्सून महाराष्ट्राच्या उत्तरी सीमेवर दाखल झाला आहे. सुरत, जळगाव, गोंदिया येथे परतीच्या पावसाची नोंद झाली असून, पुढील चार ते पाच दिवसांत मॉन्सून संपूर्ण राज्यातून माघार घेईल," अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, नैर्ॠत्य मौसमी पाऊस पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या उर्वरित भागातून, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील काही भाग तसेच गुजरातच्या आणखी काही भागातून माघारी परतला आहे. गेल्या २४ तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

४ आॅक्टोबर: कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
५ आॅक्टोबर: गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
६ आणि ७ आॅक्टोबर: कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.टॅग्स